s5.jpg
s5.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

काँग्रेसच्या आमदाराने विधानसभेतच काढला शर्ट...

वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवशी एका आमदाराने धोरणाचा निषेध करण्यासाठी चक्क विधानसभेत शर्ट काढल्याने उपस्थित सदस्यांच्या भुवया उंचावल्या. या आमदाराला सात दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. 

सभागृहातील सदस्य 'एक देश -एक निवडणूक' या मुद्यावर चर्चा करती होते. याला विरोध करण्यासाठी या आमदारांनी शर्ट काढून राज्य सरकारच्या धोरण्याच्या निषेध केला. अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा काँग्रेसचे सदस्य विरोध करत असताना भ्रदावतीचे काँग्रेसचे आमदार बी. के. संगमेश यांची हा प्रकार केला. यामुळे काँग्रेसच्या आमदारांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

कर्नाटकच्या विधानसभेत चर्चेदरम्यान काँग्रेसचे भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत आले. घोषणाबाजी करता करता संगमेश यांनी अचानक विधानसभेत अध्यक्षासमोर शर्टच काढला. हा प्रकार पाहून विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कगेरी यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काँग्रेसच्या आमदारांना नियंत्रणात ठेवण्याची विनंती केली.

संगमेश यांना कगेरी म्हणाले, "हा काय तमाशा आहे. हे विधानभवन आहे. तुम्हाला मुद्याला विरोध करायचा असेल तर जागेवर बसून जरूर विरोध करा." अध्यक्ष कगेरी यांनी विरोधी पक्षनेता सिद्धरामय्या यांना सांगितले की तुमच्या काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेत होता. पण असा प्रकार करणे योग्य आहे का? 

संगमेश कुणाचंही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. अखेर, अध्यक्षांनी त्यांना ७ दिवसांसाठी त्यांना निलंबित केलं. पत्रकारांशी बोलताना संगमेश म्हणाले, "आपण कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करत नव्हतो तर फक्त न्यायाची मागणी करत होतो" काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी संगमेश यांना समजविल्यानंतर त्यांनी शर्ट घातला. 


हेही वाचा : विधानभवना बाहेरच पोलिसाची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले, मुख्यमंत्री...!

लखनऊ : विधानभवनाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्याजवळ मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. सध्या उत्तर प्रदेश विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय सुरू आहे. या अधिवेशनासाठी विधानभवनाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक निर्मल चौबे विधानभवनच्या गेट क्रमांक सातवर तैनात होते. गुरूवारी दुपारी त्यांनी स्वत:च्या पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. यावेळी जवळच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT